जाणून घ्या अस्सल आणि डुप्लिकेट रेमेडिसिव्हिर इंजेक्शन मधील फरक !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जाणून घ्या अस्सल आणि डुप्लिकेट रेमेडिसिव्हिर इंजेक्शन मधील फरक !

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - करोना संसर्गाच्या कठीण काळात सध्या रेमेडिसिव्हिर इंजेक्शनची मागणी खूप वाढली आहे. आपल्या प्रियजनांच्या आयुष्यासाठी लोक वाट्टेल ती किंमत देऊन ही महागडी इंजेक्शन्स खरेदी करत आहेत. बर्‍याच राज्यात, हे इंजेक्शन मिळवणे, शोधणे सोपे नाही. ही इंजेक्शन्स 20 ते 40 हजारांच्या किंमतीवर विकत मिळत आहेत. सगळ्यात कहर म्हणजे तुम्ही अमाप पैसे खर्च करून जे इंजेक्शन खरेदी करता, ते देखील कधी कधी बनावट निघते !  अनेक ठिकाणी अशी बनावट रेमेडिसिव्हिर इंजेक्शन तयार करून विकणाऱ्या टोळ्याच कार्यरत झाल्याचे आढळून आले आहे. बनावट रेमेडिसिव्हिरच्या वाढत्या घटनांमुळे लोकांची चिंता आणखी वाढली आहे. अशा परिस्थितीत, आपण खरा आणि बनावट रेमेडिसिव्हिर यामधील फरक ओळखणे खूप महत्वाचे आहे . वास्तविक रेमेडिसिव्हिरच्या पॅकेटच्या वरील काही चुका वाचून आपल्याला खरे इंजेक्शन आणि बनावट इंजेक्शन यांच्यातील फरक माहित होऊ शकतो. चला, जाणून घेऊया सविस्तर. 

100 मिलीग्रामचे हे इंजेक्शन कुपीमध्ये फक्त पावडरच्या रूपातच राहते. 2021 मध्ये बनविलेल्या या इंजेक्शनच्या कुपींवर 'आरएक्सरेम्डेसिव्हिर' लिहिलेले आहे. इंजेक्शन बॉक्सच्या मागील बाजूस एक बारकोड देखील बनविला जातो. याबाबत दिल्ली पोलिस गुन्हे शाखेच्या डीसीपी मोनिका भारद्वाज यांनी ट्वीट करून अस्सल व बनावट औषध कसे ओळखावे हे सांगितले आहे.

बाजारातून रेमेडिसिव्हिर खरेदी करण्यापूर्वी या तपशीलांचा शोध घ्या. pic.twitter.com/A2a3qx5GcA

— Monika Bhardwaj (@manabhardwaj) April 26, 2021
 
- अस्सल रेमेडिसिव्हिरच्या पॅकेटवर इंग्रजीमध्ये 'For use in' असे लिहिलेले आहे,  तर बनावट इंजेक्शनच्या पॅकेटवर 'for use in' असेच लिहिलेले आहे, मात्र 'फॉर' या शब्दाची सुरुवात कॅपिटल लेटरने होत नाही. 

- अस्सल इंजेक्शनच्या पॅकेटमागील चेतावनी लाल रंगात आहे तर बनावट पॅकेटवरील चेतावनी काळ्या रंगात दिली आहे.

- इंजेक्शनच्या बनावट पॅकेट्सवर स्पेलिंगमध्ये बर्‍याच चुका आहेत, जे काळजीपूर्वक वाचल्यास स्पष्ट होईल.

- वास्तविक रेमेडिसिव्हिर इंजेक्शनची काचेची कुपी खूप हलकी आहे. लक्षात ठेवा की या भयंकर करोनासंकटातही फसवणूक करायला मागेपुढे पाहत नाहीत, त्यामुळेच  हे इंजेक्शन योग्य ठिकाणाहून योग्य किमतीत विकत घेणे आवश्यक आहे.